शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या मातोश्री यांचे निधन

खेड दि. ९ (सुरेश सप्रे) :- कोकणातील शिवसेना नेते माजी मंत्री रामदास भाई कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे याच्या १००व्यावर्षी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्य विधी आज मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १. ३० वाजता जामगे (खेड) स्मशानभूमी येथे होईल.
त्यांच्या निधनाने खेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. कै लीलाबाई कदम यांना चार मुलगे सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. निधनाच्या वेळी त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त होते. त्यांच्या निधनाने कदम कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
लिलाबाई कदम या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत. दीर्घकाळापासून त्या वयोमानानुसार आजारी होत्या आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या अत्यंत शांत स्वभावाच्या, मनमिळावू.व धार्मिक वृत्तीच्या होत्या. कुठल्याही प्रसंगी सर्वांना बरोबर घेऊन मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम म्हणूनच कदम कुटुंबातील अनेक सदस्य समाजकार्यात अग्रेसर आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि सहवास सर्वांसाठी महत्त्वाचा होता. स्थानिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून लिलाबाई कदम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.
लिलाबाई कदम यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार आज दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील जामगे येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर कदम कुटुंबातील सदस्यांसह अनेक नातेवाईक, गावकरी आणि कार्यकर्ते जामगे येथे जमा होवू लागले आहेत.
मृत्युसमयी त्यांच्या मागे चार मुले, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, नात सुना आणि नात जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कदम कुटुंबाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



