मालदीवज येथील ७ व्या विश्व् कप कॅरम स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी

मुंबई दि. ८ :- मालदीवज येथे दि. २ ते ६ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या ७ व्या विश्व् कप कॅरम स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली असून ७ गोल्ड, ४ सिल्वर व ३ ब्रॉन्झ मेडल्स पटकवली आहेत. या संघात ८ पैकी निम्मे म्हणजेच ४ खेळाडू महाराष्ट्रातील होते. ही महाराष्ट्र कॅरम असोसिएशनसाठी अभिमानाची बाब आहे.
या स्पर्धेतील माजी स्विस लीग विजेती काजल कुमारीने सांघिक गटात १ गोल्ड, दुहेरी गटात १ गोल्ड व एकेरी गटात १ सिल्वर मेडल पटकवले आहे. ती आज रात्री एअर इंडिया ( AI 2977 ) या विमानाने मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळावर ( T2 ) पोहोचत आहे तर तिसऱ्यांदा विश्व् स्तरावर आपला झेंडा रोवणारा माजी विश्व् विजेता प्रशांत मोरे याने या स्पर्धेत सांघिक व एकेरी गटात मिळून २ गोल्ड मेडल्स व दुहेरी गटात १ सिल्वर मेडल अशी कमाई केली आहे. माजी विश्व् कप विजेत्या संदीप दिवेने सांघिक गटात १ गोल्ड व दुहेरी गटात १ सिल्वर मेडल मिळवले आहे.
अभिजित त्रिपणकरने सांघिक व दुहेरी गटात मिळून २ गोल्ड मेडल्स व एकेरी गटात १ ब्रॉन्झ मेडल पटकवले आहे. हे तीनही खेळाडू आज रात्री १२ वाजता एअर इंडिया ( AI 2433 ) या विमानाने आंतर राष्ट्रीय विमानतळावर ( T 2) पोहोचत आहेत. या आनंदाच्या क्षणाचे साक्षी होण्यासाठी व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावातीने त्यांचे स्वागत करण्यासाठी श्री. अरुण केदार, सचिव श्री. अजित सावंत, खजिनदार, श्री. यतीन ठाकूर, उपाध्यक्ष व कॅरम खेळाडू, पंच, पदाधिकाऱ्यांनी व कॅरम रसिकांनी मोठ्या संख्येने उपास्थित होते.



