रत्नागिरी

पहिल्या दोन तासांमध्ये जिल्ह्यात १४.२६ टक्के मतदान

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्राला दिली भेट

रत्नागिरी दि. २ :- रत्नागरी जिल्ह्यातील ४ नगर परिषदा व ३ नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली असून, पहिल्या दोन तासांमध्ये जिल्ह्यात १४.२६ टक्के मतदान झाले. रत्नागिरी नगर परिषदेसाठी पहिल्या दोन तासात १०. ०५ टक्के मतदान झाले.

सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. एका मतदान केंद्रात नवरदेवाने सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मतदान केंद्र क्रमांक २ देसाई हायस्कूल येथील सखी मतदान केंद्राला भेट दिली.

पहिल्या दोन तासांमध्ये जिल्ह्यात एकूण १८८४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button