
देवरूख दि. ३ (सुरेश सप्रे) :- रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका देवरुख आयोजित स्व. बाळासाहेब पित्रे स्मृती सहावी रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन मानांकन स्पर्धा २०२६ दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सुलभाताई आपटे क्रीडा संकुल देवरुख येथे होणार आहे.

या स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे गट असतील.
अंडर 11: BS, GS
अंडर 13: BS, GS
अंडर 15 : BS, GS
अंडर 17 : BS, GS, BD, GD
अंडर 19 : BS, GS, BD, GD
खुलागट : MS,WS, MD, WD, XD
35+वरील गट : MS, WS, MD
४०+वरील गट – MS, WS, MD.
5O + वरील गट – MS, WS, MD.
अशा विविध गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये जिल्हातील मानांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्यांना आकर्षक चषक आणि रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती सचिव निलेश भुरवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला बास्टचे उपाध्यक्ष दिलीप विंचू, सचिव निलेश भुरवणे, खजिनदार राजेश जागुष्टे, सहखजिनदार अभिषेक अग्रवाल, स्पर्धा प्रमुख अवधूत मेस्त्री, बेस्ट कार्यकारणी सदस्य रुपाली नलावडे, हरेश पटेल व स्पर्धा कमिटी सदस्य विक्रांत दर्डे व सोहम प्रभुदेसाई उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा कमिटी प्रमुख अवधूत मेस्त्री, अभिषेक अग्रवाल, आशिष प्रभुदेसाई, सोहम प्रभुदेसाई,प्रमोद भालेकर राजू जागुष्टे, हरेश पटेल, रूपाली नलावडे, वरद शिंदे, विक्रांत दरडे, विनोद राठोड स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेत आहेत.



