रत्नागिरी

रत्नागिरीचे सुपुत्र ॲड. किरणराज खेडेकर यांचीही जिल्हा न्यायाधीश पदी निवड

रत्नागिरी दि. २८ :- रत्नागिरीचे सुपुत्र आणि श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजचे विद्यार्थी ॲड. किरणराज सिताराम खेडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश पदी निवड केली आहे, मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या २०२४ सालच्या जिल्हा न्यायाधीश पदाच्या परिक्षेत यश संपादन केल्याने ही निवड झाली आहे.

रत्नागिरीचे माजी नगरसेवक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे माजी सदस्य श्री. एस्. बी. खेडेकर यांचे ॲड. किरणराज हे सुपुत्र आहेत. ॲड. किरणराज खेडेकर यांची जिल्हा न्यायाधीश पदी निवड झाल्यामुळे व‌कील वर्गातुन व सर्व सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button