रत्नागिरीच्या विकासासाठी मुंबईस्थित मंडळासमवेत ना. उदय सामंत यांचा संवाद

मुंबई दि. १४ :- आज दादर (पूर्व), मुंबई येथे रत्नागिरी–संगमेश्वर येथील मुंबईस्थित मंडळांच्या सभेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित राहून संबोधित केले.
या निमित्ताने ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर संवाद साधला. या वर्षभरात रत्नागिरी मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांचा कार्यअहवाल सादर करताना रत्नागिरीतील मुंबईकर बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.

रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणखी जोमाने कार्य करत राहू — हाच निर्धार आज या भेटीमधून अधिक दृढ झाला असल्याचे मा. ना. उदयजी सामंत म्हणाले. त्यावेळी सभेला मुंबईतील 155 मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



