रत्नागिरी दांडिया नाईट कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी वाजवली विविध वाद्य व सर्वांना दिल्या शुभेच्छा!

रत्नागिरी दि. २ :- रत्नागिरीत नवरात्रोत्सवानिमित्त उदय सामंत प्रतिष्ठान आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य “रत्नागिरी दांडिया नाईट” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थित राहून नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान ना. सामंत यांनी स्वतः विविध वाद्य वाजवून उपस्थित नागरिकांसोबत सणाचा आनंद द्विगुणीत केला. त्यांच्या सहभागामुळे तरुणाईत अधिक उत्साह आणि ऊर्जा संचारली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या रत्नागिरीकरांनी गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्साह, आनंद आणि एकात्मता यामुळे संपूर्ण परिसर सणाच्या रंगात न्हाऊन निघाला.



