रत्नागिरी

पडवळ फाउंडेशन मार्फत ५०० दप्तरांचे मोफत वाटप

कळझोंडी दि. १७ :- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी येथील ” सी.७ पडवळ फाउंडेशन ” मार्फत प्राप्त मोफत ५०० दप्तरांचे वाटप माध्यमिक विद्यालय वरवडे व कळझोंडी केंद्रातील १२ जिल्हा परिषद शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले.

” सी.७ पडवळ फाउंडेशनचे” मालक संजिता विनायक पडवळ, विनायक मनोहर पडवळ यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम गेली अनेक वर्षे राबविण्यात येत आहे.सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात हा उपक्रम राबविला गेला आहे.

सदरचा उपक्रम राबविण्यासाठी व देणगी मिळवण्यासाठी वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी नागरिक, उद्योजक चंद्रकांत विचारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यामध्ये वरवडे हायस्कूल,जि.प.वरवडे खारवीवाडा, वरवडे भंडारी, वरवडे वरचे, कळझोंडी न.१,२,३,४. वरवडे धनगरवाडा, रिळ,उंडी,देऊड या शाळांतील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना या मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले.या स्तुत्य उपक्रमाचे शाळेतील शिक्षक व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी देणगीदार ” सी ७ पडवळ फाउंडेशन ” कळझोंडीचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button