रत्नागिरी

शिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जिल्हा परिषद 'आदर्श शिक्षक' आणि 'आदर्श शाळा' पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी, दि. १३ जुलै : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न कसे साकार होईल, याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी घ्यावी,” अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) आणि आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२५ व २०२५-२६) चा दिमाखदार वितरण सोहळा आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आज झाला. या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याला भारतरत्न पा. वा. काणे आणि सानेगुरुजींसारख्या महान विभूतींचा वारसा लाभला आहे. सानेगुरुजींच्या आईने दिलेला ‘ह्रदयाला आणि मनाला मळ लागणार नाही’ हा विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना प्रत्यक्ष राबवला पाहिजे. शिक्षकांनी संघर्षापेक्षा संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातही ‘दामले विद्यालया’सारख्या दर्जेदार शाळा निर्माण व्हाव्यात आणि पुढील वर्षी जिल्ह्यातील किमान ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतील, हे उद्दिष्ट शिक्षकांनी प्रामाणिकपणे पूर्ण करावे.

‘शिव्यामुक्त’ आणि ‘नशामुक्त’ शाळेचे आवाहन

अस्मिता केंद्रे (अध्यक्ष, जि.प.): शासकीय कामकाजासोबतच मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याचे शिक्षकांचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या विशेषतः पदोन्नती देण्यापासून मी कामकाजाला सुरुवात केली.

वैदेही रानडे (मुख्य कार्यकारी अधिकारी): जिल्ह्यातील १००% शाळा ‘निपुण शाळा’ घोषित करण्याचे आपले ध्येय आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि त्यांच्यात चांगल्या वर्तनाची सवय लावण्यासाठी आता ‘शिव्यामुक्त शाळा’ आणि ‘नशामुक्त शाळा’ हे मिशन हाती घेण्याची गरज आहे. तसेच, पटसंख्येअभावी एकही शाळा बंद पडणार नाही, याची काळजी शिक्षकांनी घ्यावी.

उपाध्यक्ष श्री. चाळके व शिक्षण सभापती श्री. मुरकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा आणि शिक्षकांची यादी खालीलप्रमाणे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button