रत्नागिरी

संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचे वतीने आयोजित तालुकास्तरीय पठण स्पर्धा उत्साहात पडल्या पार

तरवळ दि. १४ (अमित जाधव) :- जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय पठण स्पर्धा रविवार दिनांक ११ जानेवारी२०२६ रोजी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथील भक्त निवास येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या.

या स्पर्धेचे उदघाटन सकाळी १०- ३० वाजता संस्थान श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान चे सरपंच निलेश कोल्हटकर यांनी केले. त्यावेळी त्यांच्या समवेत खजिनदार अमित मेहेंदळे, सचिव विद्याधर शेंडे, पंच विनायक राऊत, श्रीराम केळकर, श्रीहरी रानडे, हे उपस्थित होते.

सदर स्पर्धा या इयत्ता पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. सहा गटांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. तालुक्यातील १६२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या पठण स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या पठण स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे.

गट क्रमांक एक : पहिली ते तिसरी

या साठी विषय होता श्री गणपती स्तोत्र संस्कृत या मध्ये प्रथम क्रमांक ऋग्वेद रितेश रेवाळे (कृ . वी.आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी), द्वितीय क्रमांक देविका दिनेश चव्हाण( जि. प. प्राथमिक शाळा गणपतीपुळे), तृतीय क्रमांक स्वरा अनिल रामाणी (जि. प. प्राथमिक शाळा भंडारपुळे),

गट क्रमांक दोन: तिसरी ते चौथी 

या गटा साठी विषय होता मनाचे श्लोक (६१ ते ८०) या मध्ये प्रथम क्रमांक भक्ती निलेश अभ्यंकर (जि. प. प्राथमिक शाळा मालगुंड तळेपाट नंबर २), द्वितीय क्रमांक सौमी सुशील भुते (जि. प. प्राथमिक शाळा भगवतीनगर), तृतीय क्रमांक ईशान प्रणव काणे (जि. प . प्राथमिक शाळा निवेंडी).

गट क्रमांक तीन : पाचवी ते सहावी

या गटा साठी विषय होता मनाचे श्लोक (१८१ ते २००) यामध्ये प्रथम क्रमांक वल्लरी विश्वनाथ मुकादम (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक स्वरा मकरंद काणे (बळीराम परकर विद्यालय मालगुंड), तृतीय क्रमांक वैष्णवी शैलेश घाणेकर (जि. प प्राथमिक शाळा भगवतीनगर ).

गट क्रमांक चार : सातवी ते आठवी

या गटा साठी विषय होता रामरक्षा या मध्ये प्रथम क्रमांक धैर्या नरेंद्र गावणकर (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक अनय वैभव कानडे (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), तृतीय क्रमांक आर्या अतुल रानडे (बळीराम परकर विद्यालय मालगुंड).

गट क्रमांक पाच: नववी ते दहावी

या गटा साठी विषय होता शिव महिन्म स्तोत्र या मध्ये प्रथम क्रमांक निधी चारूल मोडक (फाटक हायस्कूल रत्नागिरी), द्वितीय क्रमांक श्रीराज राजेश ओक( बळीराम परकर विद्यालय मालगुंड), तृतीय क्रमांक श्रीयश श्रीहरी रानडे (बळीराम परकर विद्यालय मालगुंड )

गट क्रमांक सहा: अकरावी ते बारावी

या गटा साठी विषय होता श्रीमद् भगवदगीता १६ वा अध्याय या मध्ये प्रथम क्रमांक प्रांजली सतीश बोले (जयगड ज्युनिअर कॉलेज), द्वितीय क्रमांक श्रुती सिद्धार्थ चव्हाण (जयगड ज्युनिअर कॉलेज), तृतीय क्रमांक स्वानंदी पंकज भोसले (जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालय).

विजेत्या पहिल्या तीन गटातील सर्व स्पर्धकांना त्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रत्येकी रोख रुपये १२५१, १००१, ७५१ तर उर्वरीत तीन गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी रोख रुपये १७५१, १५५१, १२५१ तसेच सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तु मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान समिती चे सरपंच आणि सर्व पंच तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भक्त निवास भगवतीनगर येथे पार पडला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री पाटवकर, वासुदेव केळकर, श्रीकांत मेहेंदळे, मिलिंद सुर्वे, बाबासो बेडक्याळे, सुशांत लाकडे यांनी काम पाहिले. तसेच या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान चे सर्व कर्मचारी तसेच भक्त निवास येथील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली व ही स्पर्धा यशस्वी रीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button