रत्नागिरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरीचे माजी शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

रत्नागिरी दि. ५ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरीचे माजी शहर अध्यक्ष अद्वैत सतीश कुलकर्णी यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये नुकताच प्रवेश झाला आहे.

५ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण, माजी आमदार सूर्यकांत दळवी, विनय नातू आणि श्री. वैभव खेडेकर (माजी नगराध्यक्ष,खेड) यांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी खेड येथे पक्षात प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान अद्वैत कुलकर्णी हे राज ठाकरेंचे रत्नागिरीतील निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी मनसे मध्ये असताना रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. त्यांच्या काळात मनसेने शहरातील समस्यांबाबत अनेक आंदोलन देखील केली होती. त्यांच्या शहर अध्यक्ष च्या काळात त्यांनी पक्षाची ठाम भूमिका बजावून विरोधकांना घाम फोडला होता.

एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये १० नंबर वार्ड मध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button