महाराष्ट्र

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या “दाही दिशा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार

मुंबई दि. ५ :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या “दाही दिशा” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला.

“दाही दिशा” या पुस्तकामधून स्त्रीशक्तीचा प्रवास, महिलांच्या नेतृत्वक्षमतेचा तेजस्वी ठसा आणि समाजातील त्यांच्या भूमिका यांचा सखोल आढावा घेतला आहे. नीलम ताईंनी सहा विभागांमध्ये या पुस्तकाची मांडणी करत स्त्री सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला आहे, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले. या सोहळ्यात नीलम ताईंच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या २९ पुस्तकांच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल ना. उदय सामंत यांनी अभिनंदन केले आणि त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुचवले.

कार्यक्रमादरम्यान नीलम ताईंना विनंती करत ना. उदय सामंत यांनी असंही सांगितलं की — “तुमचं पुढचं पुस्तक विधानपरिषदेमधील अनुभवांवर असावं; ते इतकं प्रभावी असेल की लोक ते स्वतःहून विकत घेतील!”

या प्रसंगी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, मिलिंद जोशी, राहुल गडपाले, आशुतोष रामगिर, अंकित काणे, आमदार, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने बहिणी आणि मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button