रत्नागिरीराजकीय

भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशोक वाडेकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड

रत्नागिरी दि. ३१ :- भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी, कट्टर राणे समर्थक श्री. अशोक वाडेकर यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यांना पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस श्री ओंकार फडके यांच्या हस्ते अधिकृतरित्या संघटनात्मक नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. समीर तिवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप नाचणकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू भाटलेकर, जिल्हा चिटणीस तसेच पदवीधर जिल्हा संयोजक श्री. मनोज पाटणकर, शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे, नगरसेवक श्री. राजू तोडणकर, नगरसेविका सौ. सुप्रियाताई रसाळ, शहर उपाध्यक्ष श्री. शैलेश बेर्डे, शहर उपाध्यक्ष श्री. संतोष सावंत, सरचिटणीस श्री. निलेश आखाडे, सरचिटणीस, नगरसेवक श्री. बाबू सुर्वे, जिल्हा सदस्य श्री. शेखर लेले, श्री. आण्णा करमरकर, श्री. बिजली खान, श्री. राजन फाळके, श्री. पुंडलिक पावसकर, श्री. विजय माळवदे, श्री. आलीम, श्री. प्रसाद बाष्टे, श्री. मंदार भोळे, ऋषिकेश केळकर, श्री. मन्सूर मुकादम, श्री. समीर वस्ता, श्री. नरेंद्र कदम, श्री. तुषार देसाई, श्री. शंकर शिंदे, श्री. संजीव बने, श्री. नितिन गांगण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button