रत्नागिरी

आंबव पोंक्षे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन

देवरूख दि. ९ (सुरेश सप्रे) :- येथील तहसिलदार कार्यालय आणि माखजन मंडळ यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1 चे आयोजन जि. प.पू.प्रा.शाळा, आंबव पोंक्षे ता. संगमेश्वर येथे करण्यात आले.

सदर शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, पं. स. सदस्य महेश जड्यार, पं. स. सदस्या प्रिया सुवरे, नायब तहसीलदार सुदेश गोताड, माखजन मंडळातील सर्व गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी, सर्व विभागांचे अधिकारी/कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी महसूल, भूमि अभिलेख, कृषी, वन, आरोग्य, ग्रामविकास, ICDS, परिवहन, महा इ सेवा केंद्र या विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी विविध विभागांच्या स्टॉल्स ला भेट देऊन माहिती घेतली.

याप्रसंगी संजय गांधी विभागाच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे आदेश, जीवंत 7/12 मोहिमेतील लाभार्थी, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार शेरा कमी केलेले, भो.व.2 चा भो.व.1 केलेले डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8अ, उत्पन्न दाखले वितरित करण्यात आले.

शासनाच्या या अभियानाबाबत सर्व उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल माखजन मंडळ अधिकारी सागर करंबेळे आणि मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माखजनचे मंडळ अधिकारी सागर करंबेळे यांनी आणि सूत्रसंचालन रवींद्र घाणेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button