रत्नागिरी

कामगार हा कर्मयोगी म्हणून संबोधला जावा : राज आंब्रे

चिपळूण दि. १२ जुलै : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूणच्या वतीने कामगार कल्याण केंद्र चिपळूण येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त एक अपत्य किंवा दोन मुलीवर कुटूंब नियोजन करणाऱ्या कामगार सुखी दांपत्याचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समारंभाचे उदघाटन दिपप्रज्वलन व रोपसंवर्धन मान्यवरांचे हस्ते करून पार पडले.

लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे कार्यकमाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना कामगार हा कर्मयोगी असून त्याच्या कार्यक्षमतेवर औद्योगीकरण अवलंबून असताना तो त्रस्त न राहता नेहमी व्यस्त व मानसिक व कौटूंबीक दृष्ट्या सक्षम राहीला तरच औद्योगीकरणास बळ देत अर्थव्यवस्था सक्षम बनवेल. करीता मंडळाने शासनस्तरावर देऊ केलेले उपक्रम विशेष फलदायी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

सुखी दांपत्याचा सत्कार हा कार्यक्रम सुखावणारा असून महिला व बालविकास या शासनाच्या धोरणांस गती देणारा आहे असे मत संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी मांडले . कुंटूब नियोजन करताना लागणारी प्रगल्भ इच्छाशक्ती कामगारांकडून जपली जाते ही अत्यंत कौतुकास्पद आणी आदर्शवत उदाहरण ठेवलेल्या कामगार दांपत्याचा सन्मान अशा पद्धतीने होणे अभिनंदनास्पद असल्याचे प्रतिपादन विनती ऑरगॅनिक्सचे सिनिअर मॅनेजर प्रशांत साकुंडे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ ज्योती यादव तालुका आरोग्य अधिकारी यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्व सांगताना नागरिकांच्या मुलभूत गरजा भागवताना वाढत्या लोकसंख्येचा ताण कसा कमी करावा व आरोग्यदायी राहण्याकरीता जीवनशैली कशी विकसित करावी याबाबत मार्मिक भाष्य केले.

प्रसंगी ॲड. वासंती दाभोळे मनोहर तायडे राजेश पालशेतकर किशोर कदम विजय कदम वीणा थोरात वसंत चिपळूणकर मनोज हळदे सुनील पडवेकर राजेश चिंगळे रघुनाथ कासेकर छाया पोटे व पल्लवी सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे हस्ते सुखी दांपत्य म्हणून शैलेश निकम व समृद्धी निकम हिंदस्थान युनिलिव्हर लि . सुरज देसाई व ज्योती देसाई एसटी चिपळूण संदीप साळवी व स्मिता साळवी प्रीवी फाईन सर्विसेस सुबोध कुंभार व सानिका कुंभार सारंग एंटरप्रायझेस अमित जोशी व मनस्वी जोशी चिपळूण अर्बन सहकारी बँक आदी दांपत्यांना रु ५००० सन्मानधन सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यकमाचे निवेदन संस्कृती शिंदे प्रास्ताविक प्र कामगार कल्याण अधिकारी राजेन्द्र निकम आभार स्नेहा चव्हाण यांच्याबरोबर आयोजन ज्योती गाडे अक्षता जोशी संगीता सुवार ऋतुजा जोर्वेकर स्मिता शिंदे व नम्रता खेडेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button