उद्योजक सौरभ मलुष्टे आयोजित रांगोळी स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन
पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपक्रम; प्रभाग 5 आणि 6 मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी दि. १७ :- खास दिवाळीनिमित्त शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलांसाठी शिवसेना उप शहर प्रमुख सौरभ मलुष्टे यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेला दोन्ही प्रभागातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही प्रभागातील 67 महिलांनी या स्पर्धेत सहभाग लावला. स्पर्धेचे परीक्षण नामांकित परीक्षांकडून करून विजेत्या स्पर्धकांना तत्काळ बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
शिवसेना उप शहर प्रमुख आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील महिलांसाठी सलग दुसऱ्या वर्षी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीत रांगोळी काढण्याची हौस सर्वांनाच असते मात्र या हौसेला सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी केले होते.
या स्पर्धेत प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मधील महिलांनी घरीच रांगोळी काढून स्पर्धेत सहभाग घ्यायचा होता. स्पर्धेत 67 महिलांनी सहभाग लावला. सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. घरीच रांगोळी काढून या स्पर्धेत सहभाग नोंदवता येणे शक्य असल्याने दुसऱ्या वर्षी सहभागी महिला स्पर्धकांची संख्या वाढल्याचे यावेळी दिसून आले. जाणकार परीक्षांकडून या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण घरोघरी जाऊन करण्यात आले. सर्व स्पर्धकांच्या रांगोळीचे परीक्षण करून तात्काळ निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर विजेत्या स्पर्धकांना गौरवण्यात आले. यावेळी घरच्या घरी रांगोळी काढून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले.



