वाहन चालकांना प्रशिक्षण देताना परिवहन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. करपे

देवरूख दि. १६ :- वाहन चालकांना प्रशिक्षण देताना परिवहन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून परिपूर्ण ट्रेनींग देत सुरक्षिततेचा मार्ग या प्रशिक्षणातून देत सक्षम चालक बनविणेची मोठी जबाबदारी आहे हे लक्षात घेवुन या स्कूलमधे प्रशिक्षण देत आदर्श चालक निर्माण करावेत, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. करपे यांनी केले.
देवरूख येथिल शारदा साँ मिल जवळ योगेश धामणस्कर यांनी सुरू केलेल्या सोळजाई मोटार ट्रेनिंग स्कुल देवरुख शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहन अधिकारी ताम्हणकर, कुंभार, जेष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार परिषदचे जिल्हा उपा़ध्यक्ष सुरेश सप्रे, मोटार स्कुल चालक योगेश धामणस्कर व आशू धामणस्कर यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.
देवरूख हे तालुक्याचे ठिकाण असून शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना युवा पिढीसह सर्वांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी शहरात योगेश धामणस्कर यांनी सोळजाई मोटार ट्रेनिंग स्कुल सुरू करून वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे.. युवा पिढीने याचा फायदा घेऊन योग्य प्रशिक्षणतून सक्षम वाहन चालक बनविणेचे उद्दिष्ट साध्य करा असे आवाहन परिवहन अधिकारी ताम्हणकर यांनी बोलताना केले.
या कार्यक्रमात परिवहन अधिकारी वर्गाची रिक्षा व टेम्पो चालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.



