सुष्टी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ मोहिरे

देवरुख दि. १२ :- संगमेश्वर तालुक्यातील गो सर्वधन करणाऱ्या सृष्टी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते सनातनचे कार्यकर्ते पंढरीनाथ धोंडू मोहिरे यांची निवड करण्यात आली.
या सभेला सृष्टी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब गोविंद गुरव, सौ. मालन गुरव, रत्नागिरी जि. मध्य. बँक संचालक मधुकर टिळेकर, ऋषीकेश लिंगायत आदी उपस्थित होते
सृष्टी सेवा संस्थेचे मार्फत तालुक्यातील गोशाळा व गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायास चालना देतानाच गाईची होणारी हेळसांड थांबेल अशा प्रकारे विविध उपक्रम राबविले जातात.
बाबासाहेब गुरव यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेले काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेच चालू ठेवत तालुक्यातील शेतकरी वर्गाला जोडधंद्यातून गोपालन व दुग्ध व्यवसायासाठी प्रवृत्त करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही मोहिरे यांनी यावेळी बोलताना दिली.



