स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात भाजपची कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार

मुंबई दि. १२ :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत लढायच्या यावर चर्चा झाली.
या बैठकीला रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील उपस्थित होते. कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार डॉ. विनय नातू , सुर्यकांत दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद सांवत, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, प्रशांत यादव आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नगरपरिषद, नगरपंचायत, जि. प., पंचायत समिती निवडणुकांचा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीत निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत लढायच्या यावर चर्चा झाली.



