
रत्नागिरी दि. ५ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व कराटे असोसिएशन रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन दि. ४ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक श्री. सुदेश मयेकर व श्री. मनु गुरव, तालुका क्रीडा अधिकारी श्री. गणेश जगताप तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका रत्नागिरी, खेड, चिपळूण, देवरुख लांजा, राजापूर, दापोली येथील शाळांमधील एकूण १५० पेक्षा जास्त कराटे खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला होता,
कराटे असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.जावेद मिरकर, उपाध्यक्ष श्री. दीपक कदम, सचिव श्री. सूरज बने, खजिनदार श्री. अरुण बेग, नौशिन कापडी तसेच गुहागर येतील कराटे प्रशिक्षक डॉ. योगिता खाडे व हुजेफा ठाकूर, तसेच क्रीडा शिक्षक गावडे, समीर सर, मंगेश हटकर सर, सुधीर शिंदे, विशाल सर,यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा २०२५ ही शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सदर स्पर्धेमधील विजयी खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी निवडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



