राज्याला २०२९ पर्यंत ‘नंबर वन’ करण्याचा महायुतीचा संकल्प: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण

सावंतवाडी दि. ६ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून, राज्यात दूरदृष्टी ठेवून चौफेर विकास चालू आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार एकत्रितपणे काम करत असल्याने सर्व प्रकल्प व योजनांसाठी निधी कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, २०२९ पर्यंत राज्याला सर्व क्षेत्रांत ‘नंबर वन’ करण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, प्रसन्न देसाई, मनोज नाईक, ॲड. अनिल निरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



