रत्नागिरी

रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक पाच मधून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ!

रत्नागिरी दि. १९ :-  रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून, प्रभाग ५ मधून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रभागातून शिवसेनेचे सौरभ मलुष्ट्ये आणि सौ. पूजा पवार या निवडणूक लढवत असून, नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. शिल्पा सुर्वे यांच्यासह प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

प्रभाग ५ मधील महायुतीचे नगरसेवकपदाचे उमेदवार सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाचणे येथील ऐतिहासिक नवलाई मंदिरात करण्यात आला. प्रचाराचा धार्मिक पद्धतीने श्रीगणेशा करत, नवलाई देवीच्या चरणी श्रीफळ आणि महायुतीचा जाहीरनामा ठेवून हा सोहळा पार पडला.

या शुभारंभ सोहळ्याला प्रभाग ५ मधील दोनशेहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. तसेच महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button