देव, घैसास, कीर महाविद्यालयात वाणिज्य, विज्ञान शाखेतर्फे प्रतिकृती प्रदर्शन

रत्नागिरी दि. १९ : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग आणि आयक्यूएसी आणि विज्ञान शाखेतर्फे वाणिज्य व विज्ञान शाखा प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील संशोधन कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि शिक्षण अधिक आकर्षक आणि अर्थपूर्ण बनविण्यासाठी एक व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेवर आधारित ३० प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. या प्रदर्शनास फाटक कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आणि शिक्षक आदी सुमारे २०० हून अधिक जणांनी भेट दिली.

त्याचप्रकारे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित प्रयोग आणि प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनास फाटक कनिष्ठ महाविद्यालय व पटवर्धन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी भेट दिली. या प्रदर्शनाला १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली. व विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी साळगावकर, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. वैभव घाणेकर याप्रसंगी प्रमुख उपस्थित होते. वाणिज्य शाखेच्या विभाग प्रमुख प्रा. राखी साळगावकर, वाणिज्य शाखेतील प्रा. वैभव कीर व प्रा. बावधने, प्रा. स्मार्था कीर यांनी प्रदर्शनासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले.



