रत्नागिरी

प्रबोधन संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा माने यांचा उद्या सन्मान सोहळा

देवरूख दि. १९ :-  प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव- देवरूखच्या कार्याध्यक्षा व शिवसेना उबाठाच्या महीला नेत्या सौ. नेहा रवींद्र माने, या शनिवारी दि. २०डिसेंबरला आपल्या वयाची साठी पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त सौ. माने यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेचेवतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सामाजिक, शैक्षणिक, राजकिय व सहकार या सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे कार्यकुशल, बहुआयामी व्यक्तीमत्व सौ. नेहाताई माने यांचे समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा प्रबोधन शिक्षण संस्थेच्यावतीने “सन्मान सोहळा” मराठा भवन देवरूख या ठिकाणी सायं. ७.००वाजता आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पुष्पगुच्छ वा भेटवस्तू स्विकारल्या जाणार नसल्याने कुणीही पुष्प वा भेट वस्तू आणू नये असे संयोजकांनी आवाहन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button