रत्नागिरीतील प्रभाग क्र. ५/६ मधील महिलांसाठी आज व उद्या देवी दर्शन यात्रा
प्रभागातील सौ. पूजा पवार यांचा अभिनव उपक्रम!

रत्नागिरी दि. २३ :- रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. उदय सामंत आणि राजापूरचे आमदार श्री. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनात उत्सव नवरात्रीचा, उत्सव आदिशक्तीच्या मायेचा हा सलग चौथ्या वर्षी प्रभाग क्रमांक ५/६ मधील महिलांसाठी देवींच्या दर्शनाचा योग जुळवून आणलाय सौ. पुजाताई पवार यांनी.

श्री भगवती देवी, महालक्ष्मी, जुगाई, नवलाई आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आडिवरेची महाकाली देवी यांच्या दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यातील पहीली बस आज मार्गस्थ झाली. या उद्घाटन सोहळा प्रसंगी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, माजी नगराध्यक्ष श्री. बंडयाशेठ साळवी, सौ. पुजाताई पवार, उपविभाग प्रमुख श्री. सुनिल शिवलकर, सौ.काव्या कामतेकर, उपविभाग प्रमुख विशाल सावंत, मौलवी नदाफ, श्रीयोग चव्हाण, वेदांत सावंत, सुरेश यादव, तेजलताई पाटील, अंजलीताई सावंत, श्वेता यादव, श्री. नलावडे शेठ, संतोष शिंदे, रोहीत शिंदे, शौर्य मांजरेकर, जितेंद्र मोडक,यश पवार आणि प्रभाग ५/६ मधील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रसंगी देवी दर्शनासाठी निघालेल्या महीला वर्गाची लक्षणिय उपस्थिती होती. आज दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ आणि १० वाजता दर्शन शुभारंभ दोन A.C बसेस गाड्या सोडण्यात आल्या. उद्याही सकाळी ९ वाजता क्रांन्तिनगर महालक्ष्मी मंदिर आणि १० वाजता ऍक्टिव्हिटी सेंटर येथुन सोडण्यात येणार आहेत.


