
रत्नागिरी दि. ७ :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तातडीने आज सकाळी 6 वाजण्याचा सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
तसेच या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेडच्या प्रांतअधिकारी वैशाली माने, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


