रत्नागिरी

तरवळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन

तरवळ दि. १ सप्टेंबर ( अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या सहकार्यातून शिवसेना (शिंदे गट) खालगाव जिल्हा परिषद गट यांच्या मार्फत एस टी ने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ ननागरिकांना आवश्यक असलेल्या NCMC कार्ड (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) नोंदणी कॅम्प चे आयोजन सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात ग्रुप ग्रामपंचायत तरवळ/आगवे येथे करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यासाठी एस टी प्रवास करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी या कार्डाची सध्या प्रत्येकाला आवश्यकता भासत आहे. कारण हे कार्ड नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकिटाचे पैसे देऊन प्रवास करावा लागेल. जर हे कार्ड तुमच्या सोबत असेल तर तुम्ही सवलतीच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता

या कार्डच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना १००%तिकीट माफ करण्यात येते. तसेच ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ६५ वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना ५०%तिकीट माफ करण्यात येते. त्याचबरोबर महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना ५०% तिकीट माफ करण्यात येते.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यासाठी हे कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे, या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्ड ची आवश्यकता आहे.

हे कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड, मोबाईल आणि ज्याचे कार्ड काढायचे आहे अशी संबंधित व्यक्ती हजर हवी, हे कार्ड काढण्यासाठी २०० रुपये आकारण्यात येतील असे सांगण्यात आले होते.

या नोंदणी कॅम्प साठी तरवळ ग्रामपंचायत हद्दीतील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा NCMC कार्ड नोंदणी कॅम्प चे यशस्वी आयोजन करण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना (शिंदे गट )आणि युवासेना करबुडे जिल्हा परिषद गटाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले होते.

या कॅम्पसाठी तरवळ येथील ज्येष्ठ नागरिक जनार्दन कुळ्ये, सरपंच रमेश मालप, महादेव मायंगडे, महादेव माचीवले, देवेंद्र माचिवले, धालाजी गोरीवले, मंदार कुळ्ये, युवासेवा विभाग प्रमुख आणि तरवळ तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकुमार कुवार , महिला शाखा प्रमुख दर्शना कुळ्ये, दुर्वा माचीवले, सायली माचीवले तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button