रत्नागिरी

देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे एक दिवसीय मेहेंदी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी दि. २८ ऑगस्ट : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि लायक्रा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवसीय मेहेंदी प्रशिक्षण कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींचे कौशल्य विकास व आर्थिक सबलीकरण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. लायक्रा अकॅडमीच्या मेहेंदी आर्टिस्ट कु. सामिया मापारी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थिनींना मेहेंदी कलेतील विविध तंत्र व डिझाईन्सचे प्रशिक्षण दिले. तसेच मेहेंदी कलेचा उपयोग स्वयंरोजगारासाठी कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. आसावरी मयेकर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना वाव देऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी मेहेंदी कलेचा छंदासोबतच स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी उपयोग होऊ शकतो, असे सांगत विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, IQAC समन्वयक प्रा. विनय बावदाने, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. विनय कलमकर, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. राखी साळगावकर, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. आसावरी मयेकर, महिला विकास कक्षातील प्राध्यापक तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ही कार्यशाळा उत्तमरित्या पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button