रत्नागिरी

अपर निबंधक तथा सहसचिव, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन यांची रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस तसेच नाटे विविध कार्यकारी सेवा सहकारी मर्या., नाटे ता. राजापूर या संस्थेस भेट

रत्नागिरी दि. २७ ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सहसचिव श्री. संतोष पाटील यांनी रत्नागरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट देवून बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

श्री. पाटील यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत रत्नागिरी जिल्हा बँक ही राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँकेमध्ये समावेश असणारी बँक असून नाबार्ड तसेच शासनाच्या सर्व निकषांमध्ये उल्लेखनिय कामगिरी असणारी जिल्हा बँक आहे, असे गौरवोद्गार काढले. श्री. संतोष पाटील यांनी बँकेच्या कामाचा आढावा घेताना कोकण विभागामध्ये शेती कर्जवाटपामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच सहकार क्षेत्रातील बँकांना प्रगती करताना कोणते धोरणात्मक बदल करणे आवश्यक आहे, यावर चर्चा केली.

यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी जिल्हा बँकांना असणाऱ्या मर्यादा व धोरणात्मक अडचणी यावर विचार मांडताना बँकेचे एक्स्पोजर लिमीट, कोकणातील सामाईक ७/१२, त्यामुळे कर्ज वितरणावर होणारा परिणाम, कोकणातील युवकांचे वाढते स्थलांतर इ. अडचणींवर शासन स्तरावर धोरणात्मक बदल आवश्यक असल्याबाबत मत व्यक्त केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा मा. संतोष पाटील यांचेसमोर सादर केला. या भेटी दरम्यान जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी तसेच बँकेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर श्री. संतोष पाटील यांनी राजापूर तालुक्यातील शासनाचा “सहकार भूषण” पुरस्कार प्राप्त नाटे विविध कार्यकारी सहकारी संस्थेस भेट देवून संस्थेच्या कामाचा आढावा घेतला.

सदर भेटीचे वेळी त्यांचे समवेत श्री.राम कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी, श्री. अमजद बोरकर, संचालक महोदय, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, श्री. संदीप तांबेकर, सरव्यवस्थापक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, श्री. पाटील, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, राजापूर, नाटे संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास फणसेकर व अन्य व्यवस्थापक समिती सदस्य व सचिव उपस्थित होते.

सदर भेटी दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात २ लाभार्थ्यांना बेबाक प्रमाणपत्र तसेच नविन कर्ज वाटपाचा चेक वितरण करणेत आले व संस्थेने नव्याने सुरू केलेल्या बचत योजनेतील ५ खातेदारांना पासबुकचे तसेच संस्थेच्या सभासदांना वृक्षारोपण संकल्पनेतून सुपारी रोपांचे श्री. पाटील यांचे हस्ते वितरण करणेत आले.

यावेळी उपस्थित संस्था कमिटी सदस्य, सभासद व सचिव यांचेशी चर्चा करताना अपर निबंधक तथ सहसचिव श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपात येणाऱ्या अडचणी जाणून घेवून कर्जव्यवहाराव्यतीरीक्त नव्याने व्यवसाय सुरू करणेसाठी संस्थेला सूचना केल्या असून संस्था राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच संस्थेच्या धान्य विभाग, एसटी आरक्षण, किटनाशके विभाग, शेती अवजारे, प्लास्टीक विभाग, ग्राहक भांडार व सीएससी सेंटर इ. विभागासही भेट देवून संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील कामकाजासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button