रत्नागिरी

गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामीसुत महाराज समाधी दिन सोहळ्याचे आयोजन

गावखडी दि. २७ ऑगस्ट : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात सदगुरू श्री स्वामीसूत महाराज समाधी दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणी पौर्णिमेनिमित्त २८ ते ३० ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत.

२८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ पूजन व अभिषेक होईल. १० वाजता सामुदायिक नामजप झाल्यानंतर ११ वाजता श्री गुरूदेवाचे मार्गदर्शन, ११.३० वाजता महानैवेद्य अर्पण व महाआरती होईल. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे वाटप होईल. दुपारी ३ वाजता स्वामी देवांना प्रार्थना, ढोल पथकासह रिंगण होईल. सायंकाळी ४ वाजता श्री स्वामी पालखी प्रस्थान, ५ वाजता सती माता स्थानी श्री स्वामींचे आगमन, पूजन होईल. यावेळी रवींद्र यशवंत तावडे यांची विशेष उपस्थिती असेल.

२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री स्वामींचे मठात आगमन होईल. ७ वाजता अखंड नामजप व जलाभिषेक आरंभ होईल. ८ वाजता नित्याची आरती होईल. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सांगता होईल.

या कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गुरूवर्य दासदिगंबर महाराज यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button