रत्नागिरी

राष्ट्र सेविका समितीच्या निवृत्त तरी कार्यरत समूहातर्फे विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांच्या चित्रांच्या वह्यावाटप

रत्नागिरी दि. ८ : राष्ट्र सेविका समितीच्या निवृत्त तरी कार्यरत या समूहातर्फे आठ शाळांतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गड- किल्ल्यांची चित्रे आणि माहिती देणाऱ्या वह्यांचे वितरण करण्यात आले. यंदा या उपक्रमाचे सलग चौथे वर्ष होते.

आतापर्यंत आम्ही ज्या शाळातून वह्या वितरण केले तेथील विद्यार्थी व शिक्षक यांना ह्या वह्या खूप आवडल्या. शिक्षकांनी या वह्यांचा उपयोग मुलांची इतिहासाविषयीची आवड व उत्सुकता निर्माण होण्यासाठी होतो, असे सांगितले. म्हणूनच प्रतिवर्षी आम्ही हा उपक्रम अधिकाधिक यशस्वीपणे विविध शाळांमधून संपर्क साधून केला जात आहे.

या वर्षी टेंभ्ये हायस्कूल, टिके केंद्र शाळा नंबर.१, कोंडखंडकर व चिंद्रवली, कुरतडे, जी. एम. शेट्ये हायस्कूल, बसणी, शिवाजी हायस्कूल, पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुर्धे या शाळांतून वह्या वितरण केले. निवृत्त तरी कार्यरत या समूहातर्फे पाच वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. दिव्यांग मूल असलेल्या महिला पालकांचा सन्मान, संस्थांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेणे आवश्यक असलेल्या गोष्टीची मदत करणे असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

वह्या वितरण कार्यक्रमासाठी निवृत्त तरी कार्यरत समुहामधील दीपिका कदम, प्रतिभा प्रभुदेसाई, सुखिता भावे, आरती दामले, प्राची करंदीकर, अनुराधा चौकेकर, नीला मराठे, स्मिता जोशी, अनुराधा ताटके आदी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button