रत्नागिरी

पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राजापूर आगाराच्या १२ बसफेऱ्या आठ दिवसांसाठी रद्द

जैतापूर दि. २३ जुलै :- पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बससेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने राजापूर आगारातील काही नियमित बसफेऱ्या दि. २० जुलै ते २७ जुलै २०२६ या कालावधीत तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. याबाबत राजापूर आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांसाठी सूचना प्रसिद्ध केली असून, प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेसाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी राजापूर आगारातील काही बस आणि कर्मचारी यात्रा सेवेत कार्यरत राहणार असल्याने पुढील नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या बसफेऱ्या :

सकाळी ६.३० – राजापूर–जैतापूर–राजापूर

सकाळी ६.३० – राजापूर–ओझरे–राजापूर

सकाळी ६.३० – राजापूर–केळवडे–राजापूर

सकाळी ७.३५ – राजापूर–मांडवकरवाडी–राजापूर

सकाळी ८.३० – राजापूर–रत्नागिरी–राजापूर

सकाळी ८.४० – राजापूर–रत्नागिरी–राजापूर

सकाळी ८.३० – राजापूर–वाल्ये–खारेपाटण

सकाळी १०.३० – राजापूर–अणसुरे–राजापूर

सकाळी ११.०० – राजापूर–रत्नागिरी–राजापूर

दुपारी २.०० – राजापूर–रत्नागिरी (पुढे सायं. ५.४५ रत्नागिरी–आंबोळगड वस्ती)

सायंकाळी ५.०० – राजापूर–नाणार–राजापूर (वस्ती)

सायंकाळी ५.३० – राजापूर–पाचल –आजिवली–पाचल–राजापूर (वस्ती)

राजापूर आगार प्रशासनाने प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी बसफेऱ्यांची माहिती आगारातून घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, तसेच होणारी गैरसोय समजून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button