रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘Mission Rising Flowers’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

रत्नागिरी दि. २१ जुलै :- पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘Mission Rising Flowers’ या उपक्रमांतर्गत आज मुकुल माधव विद्यालय, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत Cyber Awareness, Anti Narcotics (Mission Phoenix), Traffic Awareness, Good Touch – Bad Touch, Self Protection तसेच Future Career Opportunities या विषयांवर सादरीकरण करून विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले व त्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन केले.
तसेच, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महमुनी यांनी पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांना याच विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला.
‘Mission Rising Flowers’ या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, अमली पदार्थांबाबत जागरूकता, वाहतूक शिस्त, वैयक्तिक सुरक्षितता, स्वसंरक्षण तसेच करिअरविषयक मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, सुरक्षिततेची जाणीव विकसित करणे आणि त्यांचे उज्ज्वल, सुरक्षित व सशक्त भविष्य घडविण्यास हातभार लावणे हा आहे.



