महिन्याभरात भजनालाही राजाश्रय मिळणार : राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

रत्नागिरी दि. १६ जुलै :- नमन, जाकडीनृत्य, विर्दभातील झाडीपटी आणि खानदेशातील वहीगायन या लोककला प्रकारासोबत या महिन्याभरातच भजनालाही राजश्रय मिळेल, असे उद्गगार आज झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतीक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांनी काढले
आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी याच्यावतीने सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार तसेच पालकमंत्री ना. डॉ. उदय सामत यांना निवेदन देण्यात आले.
श्री. सांमत यांनी हा विषय उचलून धरला आणि सांस्कृतिक मंत्री महोदयांनीही तो विषय पूढे नेवून भजन क्षेत्रालाही राजाश्रय या महिन्याभराच मिळेल असे आश्वासित केले.
आज जयेश मंगल कार्यालय रत्नागिरी येथे नमन व जाकडी मंडळाच्यावतीने कोकणातील या कलाना राजाश्रय मिळाल्याबद्दल कृतज्ञता म्हणून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. केद्रे, नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.



