रत्नागिरी पोलीस दलाचे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन

रत्नागिरी दि. ६ :- रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी केले आहे.
नागरिकांनी पूर आलेले रस्ते, पूल किंवा ओढे पार करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच नदी, धरण, धबधबे व समुद्रकिनारी जाणे टाळावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये. आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ Dial 112 किंवा रत्नसेतु चॅटबॉट – 9371415612 वर संपर्क साधावा.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी केले आहे.



