रत्नागिरी

आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

देवरुख दि. ३१ ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या मनोगतात त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अहिल्यादेवी या न्यायप्रिय, दूरदर्शी आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीत प्रजाहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. देशभरातील अनेक मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि सार्वजनिक बांधकामांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.

आजच्या युवकांनी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन समाजहित, कर्तव्यनिष्ठा, नेतृत्वगुण आणि लोकसेवेची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र मेचकर तसेच विद्यार्थी मयूराज टक्के उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button