रत्नागिरी
कोकण परिक्षेत्राचे नव नियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांची रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट

रत्नागिरी दि. २७ :- कोकण परिक्षेत्राचे नव नियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्र किशोर मीणा यांनी रत्नागिरी जिल्ह्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
सदर भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना तसेच पोलीस दलाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.


