क्रीडारत्नागिरी

राजापूर क्रिकेट समिती आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर संघ ठरला विजेता

जैतापूर दि. ३० :- राजापूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहाचा सोहळा ठरलेली राजापूर क्रिकेट समिती आयोजित तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा राजापूरच्या ऐतिहासिक राजीव गांधी मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत साई चॅलेंजर धोपेश्वर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. चॅम्पियन्स भालावली संघाने द्वितीय तर निनादेवी डोंगर संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये भालवलीचे निवृत्ती भोसले यांना मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. धोपेश्वरच्या वैभव मांजलकर यांना उत्कृष्ट फलंदाज, देवेंद्र कदम यांना उत्कृष्ट गोलंदाज तर हर्षद चापडे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथम पारितोषिक म्हणून ₹51,111/- व चषक, द्वितीय पारितोषिक ₹25,111/- व चषक तर तृतीय पारितोषिक ₹5,111/- व चषक देण्यात आले.

या स्पर्धेचा शुभारंभ राजापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी समितीचे सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते रवी नागरेकर, कबड्डी फेडरेशनचे मोहन पाडावे, राजापूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, महेश नकाशे, योगेश नकाशे, संतोष तांबे, अरविंद लांजेकर, नगरसेवक दिलीप अमरे, सुभाष नवाळे, एडवोकेट नागरेकर आदींसह राजापूर क्रिकेट समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राजापूर क्रिकेट समितीचे पदाधिकारी महेश (बबलू) गोंडाळ, प्रशांत नागरेकर, अमित चंदूरकर, अरविंद लिगम, राजेश जोशी, सचिन राऊत, सुधीर तेरवणकर, अरविंद लांजेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सामन्यांमध्ये पंच म्हणून मंगेश ढवळे, ऋषी अमरे व भाई गाडगीळ यांनी जबाबदारी सांभाळली, तर समालोचक म्हणून रमेश चव्हाण, नरेंद्र कामतेकर व अरविंद लांजेकर यांनी रसिकांना सामन्यांचा थरार अनुभवता येईल असे समालोचन केले.

या स्पर्धेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये पोलीस निरीक्षक अमित यादव, अपूर्वा सामंत, रविंद्र नागरेकर, प्रकाश कुवळेकर, राजापूर तालुका शिवसेना संपर्कप्रमुख अनिल भोवड ,जितेंद्र खामकर, नगरसेवक दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, सौरभ पेणकर, साझिया काझी, नगरसेविका नार्वेकर मॅडम, सुयोगा जठार, योगेश नकाशे, महेश नकाशे, सुभाष नवाळे, राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे, बबन तांबे (पडवे उपसरपंच), अशोक पेडणेकर (शीळ सरपंच) यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे ही संपूर्ण स्पर्धा कोकण लाईव्ह YouTube चॅनेलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात आली, त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी घरबसल्या सामन्यांचा आनंद घेतला. एकूणच, उत्कृष्ट संघटन, खेळाडूंची दर्जेदार कामगिरी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button