
देवरुख दि. २३ :- चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आज २४ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वा. शिक्षक पतपेढी हॉल, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर बैठकीसाठी रत्नागिरी जिल्हा निरिक्षक विजयराव देसाई, जेष्ठ नेत्या नलिनी भुवड, जिल्हाध्यक्ष सुरेश बने हे उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला जाणार असून रीक्त झालेल्या पदावरील सदस्याचा पद नियुक्ती सोहळा होणार आहे.
तरी, सर्व महिला अध्यक्ष, महिला कार्यकारणी, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, व सदस्यांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष यांनी केले आहे


