रत्नागिरी

कळझोंडी येथे माता रमाई जयंती जल्लोषात साजरी

विल्ये दि. ११ :- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती, पंचशील नगर शाखा क्रमांक ११ व सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती “पंचशील बुद्ध विहार” येथे ज्येष्ठ कवी व माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली तर रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रमशील अध्यक्ष आयुष्यमान प्रकाश रामचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

यावेळी विचार मंचावर उपाध्यक्ष संदीप पवार ,सभापती प्रकाश भागुराम पवार ,सल्लागार किशोर पवार ,सेक्रेटरी सुभाष पवार, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ अध्यक्षा नलिनी पवार, सभापती नम्रता पवार, सेक्रेटरी रीना पवार ,सल्लागार मयुरी पवार, माजी सेक्रेटरी शितल पवार, बौद्धाचार्या- करुणा प्रमोद पवार यांच्यासह शाखेतील सर्व पदाधिकारी सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सेक्रेटरी सुभाष पवार यांनी केले. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर धार्मिक पूजा पाठ बौद्धाचार्या करुणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. त्यानंतर अभिवादन सभा घेण्यात आली .या अभिवादन सभेत बालिका परी पवार श्रावस्ती पवार,आयुष प्रमोद पवार, तसेच सुप्रिया पवार रीना पवार ,नम्रता पवार, सुभाष पवार, प्रमुख अतिथी प्रकाश पवार, उपक्रमशील अध्यक्ष अनिल पवार यांनी गीत गायनातून व मनोगतातून माता रमाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्यास व सामाजिक धार्मिक क्षेत्रात दिलेलं योगदान याबाबत अतिशय प्रभावी व प्रबोधनात्मक माहिती देऊन हालाखी व दुःख कसं सोसलं असेल याचे अनेक प्रसंग कथन केले व त्यांच्या उचित कार्याचा गौरव आपल्या शब्दातून केला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेक्रेटरी सुभाष पवार यांनी मानले अतिशय शांततेने व उत्तम नियोजनात सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष संदीप पवार सेक्रेटरी सुभाष पवार यांनी विशेष मेहनत घेतली .शेवटी शरणत्तेय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button