रत्नागिरी

रत्नागिरीत पद्मश्री परशुराम गंगावणे यांची पिंगुळी चित्रकथीची कार्यशाळा संपन्न

संगमेश्वर दि. १३ ( प्रतिनिधी ):- रत्नागिरी शहरातील उज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट या कॉलेज मध्ये सन्मा.पद्मश्री परशुराम गंगावणे यांची पिंगुळी चित्रकथीची कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी तालुक्यातील इ. १० वी. पुढील विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकथीची अधिक माहिती व इतिहास समजून घेण्यासाठी परशुराम गंगावणे सरांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत चित्रकथीची सुरुवात आणि प्रवास, चित्रकथी सादरीकरण करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते, चित्रकथी म्हणजे काय, बदलतं युग आणि तंत्रज्ञान, आजच्या डिजिटल युगात लोककलेचं स्थान तुम्ही कसं पाहता? अशा प्रश्नातून चित्रकथीचे अनेक पैलू विद्यार्थ्यांसमोर उलघडले गेले आणि अनमोल मार्गदर्शन केले गेले. सन्मा.एकनाथ गंगावणे यांनी मुलांना चित्रकथीचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांना रेखाटन आणि रंगकाम याबाबत मार्गदर्शन केले.

संस्थेचे संचालक सुहास भोळे, विनायक हातखंबकर, उदय शिंदे, यांच्या हस्ते पद्मश्री गंगावणे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर एकनाथ गंगावणे, डॉ. शशांक पाटील यांचाही यथोचित सत्कार संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला.पद्मश्री गंगावणे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या चित्रकथी कार्यशाळेतून लोककलेबाबत जनजागृती करण्यात आली. त्याच बरोबर पारंपरिकता ते आधुनिकता यामध्ये कलेचा संगम कसा करावा यावर विचारमंथन झाले.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रा.संदेश पालये यांनी केले होते.या कार्यक्रमास संतोष गोरीवले, मकरंद राणे, भाविका देवरुखकर, निलेश शिळकर, विजय पडावे, मधुरा घारपुरे आदी मान्यवर आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button