क्रीडारत्नागिरी

लांजाच्या खेळाडूंचा राज्यस्तरावर डंका! तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णासह कांस्य पदकाची कमाई

लांजा दि. २९ :- दि. 28 व 29 एप्रिल रोजी विरार येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिक्टरी क्लब 6 वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप 2026’ या भव्य स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या दोन खेळाडूंनी प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली.

यामध्ये विघ्नेश विनोद दिवाळे याने सुवर्णपदक जिंकत अव्वल कामगिरी केली, तर आराध्य कमलाकर सावंत याने कांस्यपदक मिळवून यश संपादन केले.

या यशस्वी कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, लांजा अकॅडमीचे अध्यक्ष श्री. किशोर यादव, मार्गदर्शक श्री. परशुराम मासये, उपाध्यक्ष श्री. अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, गौरव दीपक खेडकर, गणेश ईश्वर तोंडारे, तेजस वडवलकर, योगेश ईश्वर तोंडारे यांच्यासह सर्व खेळाडू व पालक वर्गाने विजेत्यांचे अभिनंदन केले.

लांजा तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब असून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button