रत्नागिरी

आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृतीपर विविध स्पर्धांचे आयोजन

देवरुख दि. २९ ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे व मतदानाचे महत्त्व पटवून देणे हा होता. या अंतर्गत मतदार जनजागृती प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर सादरीकरण व प्रदर्शनअशा विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आदी विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. रांगोळी व पोस्टर स्पर्धांमधून मतदानाबाबत जनजागृती करणारे संदेश आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थी व स्वयंसेवकांना मतदार शपथ देण्यात आली. “मी माझा मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावीन” असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे
निबंध स्पर्धा :प्रथम क्रमांक- ध्रुवी अशोक कांगणे, द्वितीय क्रमांक- सोलिहा सादिक आंबेडकर, तृतीय क्रमांक-ऋतुजा शशिकांत गुरव, रांगोळी स्पर्धा :प्रथम क्रमांक- हर्षदा श्रीपाद नार्वेकर, द्वितीय क्रमांकआदित्य संजय कानार, तृतीय क्रमांक- तन्वी प्रभाकर घाणेकर. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभात रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, लेखनकौशल्य व आत्मविश्वास वाढीस लागला असून अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि तहसील कार्यालय, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर आधारित तहसील कार्यालय येथे पथनाट्य सादर केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनील सोनावणे, प्रा. सीमा कोरे, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. पिया मोरे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, प्रा. विजय मुंडेकर, तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच एन. एस. एस. स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

फोटो: – स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य डॉ. तेंडोलकर, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button