रत्नागिरी

राजेंद्र माने कॉलेज आंबव (देवरूख) येथे ऑटो एक्स्पो २०२६ आयोजन

देवरुख दि. १६ (सुरेश सप्रे) :-  आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ऑटोमोबाईल विभागाच्या वतीने ऑटो एक्स्पो २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने नागरिकांना दुचाकी, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक ब्रॅन्ड आणि मॉडेल्स एकाच छताखाली पाहण्याची, टेस्ट राइड घेण्याची तसेच फायनान्स सल्लागारांकडून थेट मार्गदर्शन मिळण्याची अनोखी संधी प्राप्त होणार आहे. यामध्ये काही नवीन तर काही अन्य गाड्यांचा समावेश असणार आहे.

हा सोहोळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठ्ठी खुला असणार आहे.

या सोहोळ्यामध्ये लाईव्ह ड्रीफ्ट शो, लेटेस्ट कार आणि बाईक मॉडेल्स , नव्या युगाचे ऑटोमोबाईल तंत्रज्ञान यासारखी खास आकर्षणे समाविष्ट करण्यात आली असून या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डिझाईन तसेच उत्पादित केलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त गो कार्ट व फॉर्म्युला कार देखील पाहण्याची सुवर्णसंधी नागरिकांना प्राप्त होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button