रत्नागिरी

गुहागर येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकास अटक

रत्नागिरी दि. १४ :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत गुहागर येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यांना प्रतिबंध घालण्यासाठी व कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक 14/03/2026 रोजी गुहागर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुहागर ते श्रृंगारतळी जाणारे रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथक पेट्रोलिंग करत असताना संजय श्रीधर फनगुसकर रा. वेलदूर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी यास गुहागर-श्रृंगारतळी मागविर मोटार सायकल वरून अवैधरित्या शस्त्रे वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी श्रीधर फनगुसकर रा. वेलदूर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी याच्या ताब्यातून 1) सिंगल बॅरल बंदूक, 2) गावठी कट्टा व 3) आठ (08) जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आला तसेच आरोपीत याचे ताब्यातून एक दुचाकी वाहनासह एकूण ₹ 1,60,800/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी श्रीधर फनगुसकर रा. वेलदूर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी याच्या विरुद्ध गुहागर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 19/2026 शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 3 (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास गुहागर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व श्रे.पो.उनि. श्री. प्रशांत बोरकर, पो. हवा/288 विनायक राजवैद्य, पो.हवा/1230 प्रवीण खांबे, पो. हवा/306 गणेश सावंत व चा. पोशी/215 अतुल कांबळे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button