रत्नागिरीची कन्या आर्किटेक्ट शर्वरी पावसकर हिला मानाचा “ट्रस्टेड अँड इनोव्हेटिव्ह आर्किटेक्ट अँड डिझायनर ऑफ द इयर” पुरस्कार

रत्नागिरी दि. ५ :- रत्नागिरीची कन्या आर्किटेक्ट शर्वरी रमेश पावसकर हिला एक अत्यंत मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे. गोवा येथे आयोजित Design & Vision D&V’25 Built Environment Leadership Awards या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभात शर्वरी हिला “Trusted & Innovative Architect & Designer of the Year 2025 – Maharashtra” हा बहुमान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी देशातील 28 राज्यांमधून निवड करण्यात आली होती, आणि महाराष्ट्र मधून शर्वरीची निवड होणे हा रत्नागिरी जिल्ह्यासाठी मोठा सन्मान आहे.
हा पुरस्कार शर्वरीच्या परिश्रम, नवोन्मेषी कामकाज, सर्जनशील दृष्टिकोन आणि वास्तुकलेतील उल्लेखनीय योगदानाचे द्योतक आहे.
विशेष म्हणजे, हा गौरव दोन नॅशनल अवॉर्ड विजेते पद्मश्री आर्किटेक्ट जी. शंकर या वास्तुकलेतील महान व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते शर्वरीला प्रदान करण्यात आला.
शर्वरीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्हा रत्नागिरीकरांना अत्यंत अभिमान असून तिच्या उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा! पुढील वाटचालीत ती आणखी अनेक यशशिखरे गाठो, ही सदिच्छा.



