मनोरंजनरत्नागिरी

२४ व २५ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम

रत्नागिरी, दि. २० :- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 2 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

त्याअनुषंगाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता ‘जागर शिवबाचा’ हा शिवशाहीर प्राध्यापक प्रविण जाधव आणि संच व सोबत टीम भालकर्सचे नृत्याविष्कार, मर्दानी खेळ आणि 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता रायगडाला जेव्हा जाग येते, (सादरकर्ते श्रींची इच्छा) या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. तहसिलदार सर्वसाधारण संजय भालेराव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button