क्रीडारत्नागिरी

शालेय क्रीडा स्पर्धातून विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्ती बळावते – धनंजय शेट्ये

पैसा फंड हायस्कुलचा क्रीडा महोत्सव संपन्न 

संगमेश्वर दि. १५ ( प्रतिनिधी ):- शालेय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवामधून विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळते . याबरोबरच विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्ती बळावते असे प्रतिपादन संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी केले.

पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे तीन दिवसांचा क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. क्रीडा ध्वज फडकवल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पर्यवेक्षक प्रकाश दळवी , क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिल्यानंतर क्रीडांगणावर विविध सामन्याचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी, रस्सीखेच, लंगडी, गोळा फेक, बुद्धिबळ, लांब उडी, उंच उडी, खोखो, थाळीफेक असे विविध सामने खेळवले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button