रत्नागिरी

विल्ये रत्नागिरीत येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

विल्ये दि. ९ :- रत्नागिरी तालुक्यातील मौ. विल्ये, बौद्धजन विकास कमिटी स्थानिक तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, मानका आप्पा समिती, डी.सी.सी क्रिकेट क्लब आणि मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन कामेटीचे ऑडिटर अशोक कांबळे आणि नियोजित अध्यक्षा अनिता जयवंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर श्रामनेर आणि बौद्धाचार्य अरविंद कांबळे यांच्या सोबत मीना कांबळे,विधी कांबळे,प्राची कांबळे,मेघा कांबळे,सुरेखा कांबळे यांच्या माध्यमातून बौद्ध पूजा पाठ घेण्यात आले.

सदर कार्यक्रमात माता रमाईंच्या जीवनपटावर अभ्यासी वाचनातून समजलेली उमगलेली माय रमाई यांच्याबद्दल कु.विराज कांबळे,वीर कांबळे,नील कांबळे,अथर्व कांबळे,कीर्ती कांबळे, कबीर कांबळे या बाल विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले,तसेच माता रमाईंच्या बहुमोल परिश्रम आणि त्याग,निर्भीडपणा, स्वाभिमानी बाणा याबद्दल मार्गदर्शक विचार कमेटीचे सचिव नरेश कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे, मेघा कांबळे, मीना कांबळे,यांनी आपले विचार मांडले,तसेच प्रत्येक महान महापुरुषांच्या यशस्वी शिखराचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे योगदान महत्वाचे होते त्यांमध्ये विशेष करून तथागत बुद्धाकरिता माता यशोधरा, छ.शिवाजी महाराजांसाठी माय जिजाऊ,राष्ट्रपिता म.जोतिबा फुलें करिता माता सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.आंबेडकरांसाठी माता रमाई असे हे महत्वाचे विशेष स्त्री-कर्तबगारीचे योगदान भारताला दिशादर्शक ठरले आहे, असे प्रभावी मार्गदर्शन सुवेज कांबळे यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची अरविंद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमावेळी मिलिंद जलसा कला निकेतन मंडळाचे आजी- माजी कलाकार ,गायक, तसेच डी.सी.सी क्रिक्रेट क्लब चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button