रत्नागिरी

उत्कर्ष सेवाभावी संस्थेतर्फे उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीर

रत्नागिरी दि. २ :- उत्कर्ष सेवाभावी संस्था आयोजित व इन्फिगो आय केअर यांच्या सौजन्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक संदीप सुर्वे, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेविका व महिला जिल्हाध्यक्ष भाजपा वर्षा ढेकणे व शहराध्यक्ष दादा ढेकणे व या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून इन्फिगो आय केअर संचालक श्रीधर ठाकूर देसाई यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असा आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button